व्हिडिओ पाहण्यासाठी

आमच्याच लोकांचा बचाव होईल असे यहोवाच्या साक्षीदारांना वाटते का?

आमच्याच लोकांचा बचाव होईल असे यहोवाच्या साक्षीदारांना वाटते का?

 नाही. अनेक शतकांपूर्वी जिवंत असलेल्या, पण यहोवाचे साक्षीदार नसलेल्या लक्षावधी लोकांचाही बचाव होणार आहे. बायबलमध्ये सांगितले आहे, की देवाने प्रतिज्ञा केलेल्या नवीन जगात “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) याशिवाय, सध्या हयात असलेले असंख्य लोक जर खऱ्‍या देवाची उपासना करू लागले तर त्यांचासुद्धा बचाव होईल. अर्थात, कोणाचा बचाव होईल आणि कोणाचा नाही हे ठरवणे आपल्या हातात नव्हे, तर सर्वस्वी येशूच्या हातात आहे.—योहान ५:२२, २७.