व्हिडिओ पाहण्यासाठी

विशिष्ट चित्रपट, पुस्तके किंवा गीते यांवर तुम्ही बंदी घालता का?

विशिष्ट चित्रपट, पुस्तके किंवा गीते यांवर तुम्ही बंदी घालता का?

 नाही. एखाद्याने काय टाळले पाहिजे हे सांगण्याकरता आमची संघटना, विशिष्ट चित्रपट, पुस्तके किंवा गीते यांचे बारकाईने आगाऊ परीक्षण करत नाही. का नाही करत?

  बायबलमध्ये प्रत्येक व्यक्‍तीला तिच्या “ज्ञानेंद्रियांना” सराव देण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे जेणेकरून ती व्यक्‍ती स्वतः, चांगले आणि वाईट यांतला फरक समजू शकेल.—इब्री लोकांस ५:१४.

  बायबलमध्ये काही मूलभूत तत्त्वे दिली आहेत ज्यांच्या आधारावर एक ख्रिस्ती व्यक्‍ती मनोरंजनाची निवड करू शकते. a इतर गोष्टींप्रमाणे मनोरंजनाची निवड करतानासुद्धा आमचा उद्देश, “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून” घेणे, हा आहे.—इफिसकर ५:१०.

  कुटुंबातील मस्तकाकडे काही प्रमाणात अधिकार आहे, अशी शिकवण बायबलमध्ये देण्यात आली आहे; त्यामुळे, ते आपल्या घरातील सदस्यांना विशिष्ट प्रकारचे मनोरंजन निवडण्यास प्रतिबंध करू शकतात. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ६:१-४) पण कुटुंबातल्या सदस्यांशिवाय इतर कोणालाही, विशिष्ट चित्रपट, गीते यांवर बंदी घालण्याचा किंवा अमुक कलाकाराचे चित्रपट पाहणं अथवा संगीत ऐकणं साक्षीदारांसाठी योग्य नाही, असे म्हणण्याचा अधिकार नाही.—गलतीकर ६:५.

a उदाहरणार्थ बायबलमध्ये जादूटोणा, लैंगिक अनैतिकता किंवा हिंसाचार यांना बढावा देणाऱ्‍या सर्व गोष्टींचा निषेध करण्यात आला आहे.—अनुवाद १८:१०-१३; इफिसकर ५:३; कलस्सैकर ३:८.