व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल प्रश्नांची उत्तरं

बायबल प्रश्नांची उत्तरं

जीवनात इतकंच आहे का?

आपलं जीवन किती अल्प आहे, असं कधी तुम्हाला वाटलं आहे का?

खेळणं, काम करणं, लग्न करणं, कुटुंब वाढवणं आणि मग एक दिवस म्हातारं होणं—हे इतकंच आहे का आपल्या जीवनात? (ईयोब १४:१, २) पुष्कळ लोकांच्या, अगदी ज्ञानी लोकांच्या मनातसुद्धा हा प्रश्न आला होता, असं बायबलमध्ये म्हटलं आहे.—उपदेशक २:११ वाचा.

आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे? पण त्याआधी आपण हे माहीत करून घेतलं पाहिजे, की जीवनाची सुरुवात कशी झाली? आपल्या मेंदूची व शरीराची अप्रतिम रचना पाहून पुष्कळ लोकांची खातरी पटली आहे, की आपण आपोआप आलो नाही तर एका सुज्ञ निर्माणकर्त्यानं आपल्याला बनवलं आहे. (स्तोत्र १३९:१४ वाचा.) आणि असं आहे तर मग आपल्याला बनवण्यामागंही त्याचा काहीतरी उद्देश असावा. हा उद्देश काय आहे ते एकदा आपल्याला समजलं, की आपलं जीवन आणखी अर्थपूर्ण होईल.

देवानं मानवांना का बनवलं?

पहिल्या मानवी जोडप्याला बनवल्यानंतर देवानं त्यांना एक अतिशय रोचक काम दिलं आणि त्यांना मुलं व्हावीत, ती पृथ्वीवर भरावीत आणि त्यांनी या पृथ्वीला नंदनवन बनवून त्यात कायम राहावं, असा देवाचा उद्देश होता.—उत्पत्ति १:२८, ३१ वाचा.

पण या पहिल्या मानवांनी देवाविरुद्ध बंड केल्यामुळं देवाचा उद्देश तात्पुरत्या काळासाठी थांबला. तरीपण देवानं हार मानली नाही. या पहिल्या जोडप्याच्या मुलांना म्हणजे आपल्याला तो विसरला नाही किंवा आपल्यासाठी व पृथ्वीसाठी असलेला त्याचा उद्देश त्यानं बदलला नाही. जे लोक त्याला विश्वासू राहतील त्यांना वाचवण्याचं काम आज चाललं आहे आणि लवकरच पृथ्वीसाठी असलेला त्याचा उद्देश पूर्ण होईल! ते जीवन तुम्हालादेखील मिळावं, अशी देवाची इच्छा आहे. कारण तेच खरं जीवन देवानं आपल्यासाठी उद्देशलं होतं! (स्तोत्र ३७:२९ वाचा.) देवाच्या उद्देशाचा तुम्हालाही फायदा कसा होऊ शकतो त्याबद्दल बायबलमधून आणखी शिकून घ्या. (w15-E 08/01)