व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ९

कुटुंब मिळून यहोवाची उपासना करा

कुटुंब मिळून यहोवाची उपासना करा

“ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्याची उपासना करा.”—प्रकटीकरण १४:७, सुबोधभाषांतर.

या माहितीपत्रकाचा अभ्यास करताना तुम्ही ही गोष्ट पाहिली असेल, की तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मदत करतील अशी अनेक तत्त्वे बायबलमध्ये देण्यात आली आहेत. तुम्ही आनंदी राहावे अशी यहोवाची इच्छा आहे. त्याच्या उपासनेला तुम्ही जीवनात पहिले स्थान दिल्यास “सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील” असे आश्वासन तो देतो. (मत्तय ६:३३) तुम्ही त्याचे मित्र बनावे अशीही त्याची मनापासून इच्छा आहे. तेव्हा, देवासोबत मैत्री वाढवण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घ्या. यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही.—मत्तय २२:३७, ३८.

१ यहोवासोबतचे नाते आणखी घट्ट करा

बायबल काय म्हणते: “मी तुम्हाला पिता असा होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल,” असे यहोवा म्हणतो. (२ करिंथकर ६:१८) तुम्ही त्याचे जिवलग मित्र बनावे अशी त्याची इच्छा आहे. यहोवाचे मित्र बनण्याचा एक मार्ग म्हणजे प्रार्थना करणे. तो तुम्हाला “निरंतर प्रार्थना” करण्यास आर्जवतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) तुमच्या अंतर्मनातील विचार व चिंता जाणून घेण्यास तो उत्सुक आहे. (फिलिप्पैकर ४:६) तुम्ही कुटुंबासोबत प्रार्थना करता, तेव्हा तुमच्यासाठी देव किती खरा आहे हे त्यांना दिसून येईल.

देवाशी बोलण्यासोबतच तुम्ही त्याचे ऐकलेही पाहिजे. त्यासाठी बायबलचा व त्यावर आधारित प्रकाशनांचा अभ्यास करा. (स्तोत्र १:१, २) तुम्ही जे शिकता त्यावर मनन करा. (स्तोत्र ७७:११, १२) तसेच, देवाचे ऐकण्यासाठी ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहणेही गरजेचे आहे.—स्तोत्र १२२:१-४.

यहोवासोबत तुमचा नातेसंबंध मजबूत करण्याचा आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे इतरांना त्याच्याबद्दल सांगणे. तुम्ही जितके जास्त हे कराल तितके जास्त तुम्हाला त्याच्याजवळ गेल्यासारखे वाटेल.—मत्तय २८:१९, २०.

तुम्ही काय करू शकता:

  • बायबलचे वाचन करण्यास व प्रार्थना करण्यास दररोज वेळ काढा

  • कुटुंब या नात्याने मनोरंजन व करमणुकीपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना जास्त महत्त्व द्या

२ कौटुंबिक उपासनेचा आनंद घ्या

बायबल काय म्हणते: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) नियमितपणे कौटुंबिक उपासना करण्यासाठी एक आराखडा बनवा आणि त्याला जडून राहा. (उत्पत्ति १८:१९) पण तितकेच पुरेसे नाही. देव तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग असला पाहिजे. देवासोबत तुमच्या कुटुंबाचा नातेसंबंध मजबूत व्हावा म्हणून “घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता” त्याच्याविषयी बोला. (अनुवाद ६:६, ७) यहोशवासारखे बनण्याचे ध्येय ठेवा ज्याने म्हटले: “मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”—यहोशवा २४:१५.

तुम्ही काय करू शकता:

  • कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजा लक्षात घेऊन नियमितपणे कौटुंबिक उपासना करा