व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १

ही आनंदाची बातमी काय आहे?

ही आनंदाची बातमी काय आहे?

१. देवाकडून असलेली आनंदाची बातमी काय आहे?

मानवांनी या पृथ्वीवर आनंदाने जगावं अशी देवाची इच्छा आहे. त्याचं मानवजातीवर प्रेम असल्यामुळेच त्याने ही पृथ्वी आणि तिच्यावर असलेल्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. आनंदाची बातमी म्हणजे, तो लवकरच सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करणार आहे आणि पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांना एक चांगलं भविष्य देणार आहे.—यिर्मया २९:११ वाचा.

आजपर्यंत कोणतंही मानवी सरकार हिंसाचार, रोगराई आणि मृत्यू या समस्या काढू शकलेलं नाही. पण, लवकरच देव सगळ्या मानवी सरकारांना काढून टाकेल आणि त्याचं स्वतःचं सरकार आणेल. या सरकारच्या शासनाखाली लोक शांतीने राहतील आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं असेल.—यशया २५:८; ३३:२४; दानीएल २:४४ वाचा.

२. या बातमीकडे लक्ष देणं आज इतकं महत्त्वाचं का आहे?

दु:खांचा अंत करण्यासाठी देव पृथ्वीवरच्या सगळ्या वाईट लोकांचा नाश करेल. (सफन्या २:३) पण हे कधी घडेल? देवाच्या वचनात आधीच सांगितलं होतं, की शेवटच्या काळात मानवजातीला मोठमोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल. आज घडत असलेल्या घटनांवरून हे दिसून येतं, की आपण त्या शेवटच्या काळात राहत आहोत आणि देवाची कार्य करायची वेळ खूप जवळ आली आहे.—२ तीमथ्य ३:१-५. वाचा.

३. मग आपण काय केलं पाहिजे?

आपण देवाच्या वचनातून म्हणजेच बायबलमधून त्याच्याबद्दल शिकून घेतलं पाहिजे. बायबल एका प्रेमळ पित्याने लिहिलेल्या पत्रासारखं आहे. ते आपल्याला सांगतं, की आज आपण एक आनंदी जीवन कसं जगू शकतो आणि भविष्यात पृथ्वीवर कायमचं जीवन कसं मिळवू शकतो. हे खरं आहे, की तुम्ही बायबलबद्दल माहिती घेत आहात, ही गोष्ट सगळ्यांनाच आवडणार नाही. पण यामुळे निराश होऊन बायबलबद्दल शिकायचं सोडू नका आणि एक चांगलं भविष्य मिळवायची संधी गमावू नका.—नीतिवचनं २९:२५; प्रकटीकरण १४:६, ७ वाचा.