व्हिडिओ पाहण्यासाठी

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा​—बायबलमधल्या लोकांची कहाणी

या शृंखलेत बायबलमधल्या स्त्री-पुरुषांची कहाणी दिली आहे. त्यांनी विश्‍वासाच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडलं. a त्यांनी दाखवलेल्या चांगल्या उदाहरणांमुळे आपण आपला विश्‍वास मजबूत करू शकतो आणि देवाशी जवळचं नातं जोडू शकतो.

a या शृंखलेच्या लेखांमध्ये अशीही माहिती दिली आहे, जी बायबलमध्ये नाही. यामुळे आपल्याला बायबलमधल्या घटनांविषयी कल्पना करायला आणि त्या पूर्णपणे समजून घ्यायला मदत होते. बारकाईने संशोधन करण्यात आलेल्या या माहितीचा बायबल अहवालांशी ताळमेळ आहे. तसंच, ती माहिती ऐतिहासिक दृष्ट्या अचूक आणि उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवर आधारित आहे.

निर्मितीपासून जलप्रलयापर्यंत

हाबेल—तो जिवंत नसला, तरी आज आपल्याशी बोलतो

बायबलमध्ये हाबेलाबद्दल फारसं काही सांगितलेलं नाही; मग, त्याच्याबद्दल आणि त्याच्या विश्वासाबद्दल कोणत्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत?

हनोख: “तो देवाला संतोषवीत असे”

तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा सांभाळ करावा लागतो का? योग्य गोष्टीचा पक्ष घेणं तुम्हाला कठीण वाटलं आहे का? असं असेल तर तुम्ही हनोखच्या विश्वासापासून खूपकाही शिकू शकता.

नोहा “देवाबरोबर चालला”

नोहा व त्याच्या पत्नीला मुलांचं संगोपन करताना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं? तारू बांधण्याद्वारे त्यांनी देवावर विश्वास असल्याचं कसं दाखवलं?

नोहाचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले

नोहा व त्याचे कुटुंब मानवजातीच्या त्या बिकट काळात तग धरून कसे राहिले?

जलप्रलयापासून सुटकेपर्यंत

अब्राहाम—विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा पिता

अब्राहामानं देवावर विश्वास कसा दाखवला? तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी अब्राहामाच्या विश्वासाचं अनुकरण करण्याचं ठरवलं आहे?

“मी देवाच्या ठिकाणी आहे काय?”

ईर्ष्या, विश्वासघात किंवा द्वेष यांमुळं तुमच्या घरातील शांती भंग झाली आहे का? तर मग बायबलमधील योसेफाचा अहवाल तुम्हाला मदत करू शकेल.

सुटकेपासून इस्राएलच्या पहिल्या राजापर्यंत

रूथ—“तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”

रूथ आपलं कुटुंब आणि मायदेश सोडून जाण्यास का तयार होती? रूथच्या कोणत्या गुणांमुळं यहोवानं तिची कदर केली?

रूथ—“सद्गुणी स्त्री”

रूथ आणि बवाजाचं लग्न इतकं उल्लेखनीय का होतं? रूथ आणि नामीच्या उदाहरणावरून आपण कुटुंबाविषयी काय शिकतो?

तिनं देवाजवळ आपलं मन मोकळं केलं

यहोवावरील विश्वासामुळं हन्नाला अतिशय कठीण समस्येचा सामना करण्यास मदत मिळाली.

शमुवेल “यहोवासमोर वाढत गेला”

शमुवेलाचं बालपण इतर मुलांसारखं का नव्हतं? निवासमंडपात असताना त्याला आपला विश्वास वाढवण्यास कशामुळं मदत मिळाली?

निराशाजनक परिस्थितींतही शमुवेल टिकून राहिला

आपल्या सर्वांनाच समस्यांचा, निराशाजनक परिस्थितींचा सामना करावा लागतो आणि यामुळं आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते. अशा वेळी, विश्वासात टिकून राहणाऱ्या शमुवेलापासून आपण काय शिकू शकतो?

इस्राएलच्या पहिल्या राजापासून येशू्च्या जन्मापर्यंत

“हे युद्ध परमेश्वराचे आहे”

दावीद गल्याथाला कसा हरवू शकला? आपण दाविदाकडून काय शिकू शकतो?

अबीगईल समंजसपणे वागली

अबीगईलनं आपल्या वैवाहिक जीवनातल्या समस्या ज्या प्रकारे हाताळल्या त्यावरून आपण काय शिकतो?

एलीयानं शुद्ध उपासनेसाठी ठाम भूमिका घेतली

बायबलच्या शिकवणींशी सहमत नसणाऱ्या लोकांसोबत बोलताना आपण एलीयाचं अनुकरण कसं करू शकतो?

एलीयानं जागरूक राहून वाट पाहिली

यहोवा आपलं अभिवचन पूर्ण करेपर्यंत एलीया संदेष्ट्यानं वाट पाहत असताना प्रार्थनाशील मनोवृत्ती कशी दाखवली?

एलीयानं देवाकडून मिळणारं सांत्वन अनुभवलं

अशा कोणत्या घटना घडल्या ज्यांमुळं एलीया इतका खचून गेला की आपण मेलेलं बरं असं त्याला वाटलं?

योना स्वतःच्या चुकांमधून शिकला

यहोवाकडून मिळालेल्या जबाबदारीबद्दल योनाला जी भीती वाटली, ती तुम्ही समजू शकता का? योनाच्या कथेतून यहोवाच्या धीराबद्दल आणि दयेबद्दल आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकतो.

योना दया दाखवण्यास शिकला

प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यास योनाचा अहवाल आपल्याला कशी मदत करू शकतो?

देवाच्या लोकांसाठी तिनं जिवाची पर्वा केली नाही

एस्तेरसारखं आत्मत्यागी प्रेम दाखवण्यासाठी धैर्य आणि विश्वासाची गरज आहे.

एस्तेर सुज्ञ, धैर्यवान आणि निःस्वार्थी होती

यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेर निःस्वार्थीपणे कशी वागली?

येशू्च्या जन्मापासून प्रेषितांच्या मृत्यूपर्यंत

मरीया—“पाहा! मी प्रभूची दासी!”

मरीयेनं गब्रीएलाला जे उत्तर दिलं त्यावरून तिच्या विश्वासाविषयी आपल्याला काय समजतं? मरीयेनं आणखी कोणते उत्तम गुण दाखवले?

मरीयेनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”

बेथलेहेममध्ये आलेल्या अनुभवांमुळं यहोवाच्या अभिवचनांवर मरीयेचा विश्वास आणखी मजबूत झाला.

मरीयेने काळजावरील घाव सोसला

तुमच्या मनावर घाव झाला असेल तर येशूची आई मरीया हिचे उदाहरण तुम्हाला तो सोसण्यास मदत करेल.

विश्वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख योसेफ

योसेफानं कशा प्रकारे आपल्या कुटुंबाचं संरक्षण केलं? तो मरीयेला व येशूला इजिप्तला घेऊन का गेला?

मार्था—“मी विश्वास धरला आहे”

दुःखाच्या काळातही मार्थेनं उल्लेखनीय विश्वास कसा दाखवला?

पेत्रानं भीती व शंका यांवर मात केली

शंका धरणे घातक असू शकतं, त्यामुळं आपण स्वतःचंच नुकसान करतो. पण, पेत्रानं आपल्या भीतीवर व शंकांवर मात केली.

परीक्षाप्रसंगांतही पेत्र एकनिष्ठ राहिला

पेत्राच्या विश्वासानं व एकनिष्ठेनं त्याला येशूकडून ताडन स्वीकारण्यास कशी मदत केली?

आपल्या गुरूकडून पेत्र क्षमा करण्यास शिकला

क्षमा करण्याबद्दल येशूनं पेत्राला काय शिकवलं? येशूनं पेत्राला क्षमा केली असल्याचा कोणता पुरावा दिला?