व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?

द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?

आज आपण कुठेही गेलो तरी आपल्याला लोक एकमेकांचा द्वेष करतात असं पाहायला मिळतं. का बरं? यामागचं कारण माहीत करून घेण्यासाठी सर्वात आधी आपण पाहू, की द्वेष म्हणजे काय, लोक एकमेकांचा द्वेष का करतात आणि ही भावना कशी पसरते.

द्वेष करणं म्हणजे काय?

द्वेष म्हणजे एखाद्या व्यक्‍तीची किंवा एखाद्या समाजाची तीव्र घृणा वाटणं किंवा त्यांच्याबद्दल मनात शत्रूत्वाची भावना बाळगणं. आणि या भावनेने एकदा का मनात मूळ धरलं, की ती लवकर जात नाही.

लोक एकमेकांचा द्वेष का करतात?

यामागे बरीच कारणं असू शकतात. अनेक वेळा एखाद्या व्यक्‍तीने काय केलं आहे, त्यापेक्षा ती व्यक्‍ती कोण आहे, कोणत्या समजातून  आहे हे पाहिलं जातं आणि तिचा द्वेष केला जातो. लोकांना असं वाटतं, की ती व्यक्‍ती किंवा त्या समाजातले लोक वाईट आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला धोका आहे आणि ते कधीच सुधारणार नाहीत. तसंच, त्यांची काहीच किंमत नाही आणि त्यांच्यामुळेच आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं असंही त्यांना वाटतं. याशिवाय, इतरांचा द्वेष करणाऱ्‍या व्यक्‍तीने कधीकधी स्वतः हिंसा, अन्याय किंवा छळ सोसलेला असतो. त्यामुळे मग तीही दुसऱ्‍यांचा द्वेष करायला लागते.

ही भावना कशी पसरते?

कधीकधी लोक ज्यांना भेटलेलेही नसतात अशा व्यक्‍तींचा किंवा समाजाचा द्वेष करतात. का? कारण त्यांच्यावर इतरांच्या विचारांचा प्रभाव पडलेला असतो. उदाहरणार्थ, एखाद्यावर तिच्या घरच्यांचा किंवा जवळच्या व्यक्‍तींच्या विचारांचा प्रभाव पडला असेल, तर त्यांच्यासारखंच तोही विशिष्ट समाजाचा द्वेष करायला लागतो. आणि अशाप्रकारे, ही भावना पुढे त्याच्या जवळच्या लोकांमध्ये आणि मग इतरांमध्येही पसरत जाते.

द्वेषाची ही भावना किती सहजपणे पसरते हे आपण पाहिलं. त्यामुळे इतके लोक एकमेकांचा द्वेष का करतात हे आपल्याला समजतं. पण द्वेषाचं हे चक्र मोडून काढण्यासाठी, त्याची सुरूवात कुठून झाली हेही आपण समजून घेतलं पाहिजे. त्याबद्दलची माहिती आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळते.

द्वेषाची मूळ कारणं बायबलमध्ये दिली आहेत

माणसांमध्ये सुरवातीपासून द्वेषाची भावना नव्हती. याची सुरूवात एका स्वर्गदूतापासून झाली. त्याने देवाच्या विरोधात जाऊन बंड केलं. म्हणून त्याला दियाबल सैतान असं म्हटलं गेलं. तो “सुरुवातीपासूनच खुनी” होता. तो “खोटारडा आणि खोटेपणाचा बाप” असल्यामुळे सगळीकडे द्वेष आणि तिरस्कार पसरवत आला आहे. (योहान ८:४४; १ योहान ३:११, १२) बायबलमध्ये सांगितलं आहे की सैतान हा रागीट आणि बदनामी व निंदा करणारा आहे.—ईयोब २:७; प्रकटीकरण १२:९, १२, १७.

जन्मापासूनच माणसांमध्ये पाप आणि कमतरता असल्यामुळे द्वेषाची भावना असते. देवाने निर्माण केलेला पहिला पुरूष आदाम, सैतानाच्या पावलांवर पाऊल ठेवून चालला आणि त्याने देवाविरूद्ध पाप केलं. त्यामुळे त्याच्या मुलांमध्ये आणि नंतर सगळ्या माणसांमध्ये पाप आणि अपरिपूर्णता आली. (रोमकर ५:१२) आदामच्या पहिल्या मुलाने, काईनने द्वेषामुळे आपला भाऊ हाबेल याची हत्या केली. (१ योहान ३:१२) हे खरं आहे, की आजही बरेच लोक प्रेम आणि आपूलकी दाखवतात. पण जन्मापासूनच पापी असल्यामुळे अनेकांमध्ये ईर्ष्या, स्वार्थीपणा आणि गर्विष्ठपणा या भावना मूळ धरून असतात. आणि यामुळेच द्वेषाला खत-पाणी मिळतं.—२ तीमथ्य ३:१-५.

सहनशीलता नसल्यामुळे द्वेष वाढतो. आज आपण ज्या जगात जगत आहोत तिथे क्रूर आणि हिंसक वृत्तीला सतत प्रोत्साहन दिलं जातं आणि द्वेष पसरवला जातो. त्यामुळे लोकांमध्ये आज सहनशीलता नाही, सगळीकडे आपल्याला भेदभाव, अपमान, गुंडगिरी आणि वाईट वागणूक पाहायला मिळते. आणि या गोष्टी वाढतच चालल्या आहेत. कारण बायबल म्हणतं, “सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे”.—१ योहान ५:१९.

पण बायबलमध्ये द्वेषाची मूळ कारणं काय आहेत इतकंच सांगितलेलं नाही, तर आपण त्यावर कशी मात करू शकतो हेही सांगितल आहे.