व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण द्वेषाचं चक्र कसं थांबवू शकतो?

१ | भेदभाव करू नका

१ | भेदभाव करू नका

बायबलची शिकवण:

“देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.”​प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५.

याचा काय अर्थ होतो:

यहोवा * देव देश, वर्ण, वंश किंवा संस्कृती पाहत नाही. तर आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत, आपण कसा विचार करतो, आपल्या इच्छा काय आहेत हे तो पाहतो. खरंच, “माणूस फक्‍त बाहेरचं रूप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.”​—१ शमुवेल १६:७.

तुम्ही काय करू शकता:

एखादी व्यक्‍ती खरोखर कशी आहे हे आपण ओळखू शकत नसलो, तरी आपण देवासारखा दृष्टिकोन बाळगू शकतो. आणि भेदभाव न करता सगळ्यांना सारख्याच नजरेने पाहू शकतो. एखाद्या व्यक्‍तीमुळे तो पूर्ण समाजच तसा आहे असा विचार करू नका. आणि जर तुम्हाला असं जाणवलं, की दुसऱ्‍या देशातल्या लोकांबद्दल किंवा एखाद्या वंशाबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे, तर देवाकडे प्रार्थना करा आणि ही भावना मनातून काढून टाकायला त्याच्याकडे मदत मागा. (स्तोत्र १३९:२३, २४) भेदभावाची आणि द्वेषाची भावना मनातून काढून टाकण्यासाठी तुम्ही यहोवा देवाकडे प्रामाणिकपणे मदत मागितली, तर तो तुम्हाला नक्की मदत करेल.​—१ पेत्र ३:१२.

^ परि. 6 यहोवा (याव्हे) हे देवाचं नाव आहे असं बायबल सांगतं.​—स्तोत्र ८३:१८.

“याआधी मी गोऱ्‍या वर्णाच्या व्यक्‍तीसोबत कधी नीट बोललोही नव्हतो. . . . पण आता मी प्रामाणिक लोकांच्या जागतिक बंधूसमाजाचा भाग आहे.”​—टायटस