व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावर एक नजर

अमेरिका खंडातल्या काही लक्षवेधक गोष्टी

अमेरिका खंडातल्या काही लक्षवेधक गोष्टी

बायबलमधलं ज्ञान आजही किती मौल्यवान आहे हे पश्‍चिमेकडच्या देशातल्या बातम्या सिद्ध करतात.

तणाव कमी करायचा आहे का? ई-मेल कमी वेळा चेक करा

लोकांनी सारखे ई-मेल चेक करण्याऐवजी जर दिवसांतून फक्त तीन वेळा ई-मेल चेक केले, तर त्यांचा तणाव कमी होऊ शकतो असं व्हॅकूव्हर, कॅनडा इथं केलेल्या संशोधनात आढळलं. या अभ्यासाचे मुख्य संशोधक कॉस्टाडीन कुशलेव, या अभ्यासाच्या निष्कर्षाबद्दल असं म्हणतात: “लोकांना सारखं ई-मेल चेक करण्याचा मोह टाळणं अशक्य वाटतं, पण जर का त्यांनी हा मोह टाळला तर त्यांचा तणाव कमी होऊ शकतो.”

विचार करा: आपण शेवटल्या काळातल्या “कठीण” दिवसात जगत आहोत, तेव्हा आपला तणाव कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?—२ तीमथ्य ३:१.

माशांच्या संख्येत वाढ

वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटीच्या एका अहवालात असं लिहिलं आहे, कॅरिबियनमधल्या बेलीझ आणि इतर काही भागातली “जी क्षेत्र मासेमारी करण्यापासून राखून ठेवण्यात आली आहेत तिथं शंख, लोबस्टर आणि माशांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. जी क्षेत्र मासेमारी पासून राखून ठेवण्यात येतात, तिथं ही वाढ १ ते ६ वर्षांत दिसून येते. पण ही संख्या पूर्णपणे वाढण्यासाठी अनेक दशकं लागू शकतात.” जॅनेट गिबसन ज्या या कामाची देखरेख करतात त्या म्हणाल्या: “मासेमारी पासून जर काही क्षेत्र राखून ठेवली, तर देशात मासेमारीने कमी झालेल्या माशांच्या संख्येत पुन्हा वाढ होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचं संरक्षण होतं.”

विचार करा: निसर्गातली पुन्हा वाढ होण्याची क्षमता, एका बुद्धिमान निर्माणकर्त्याचा पुरावा देत नाही का?—स्तोत्र १०४:२४, २५.

ब्राझीलमधली वाढती हिंसा

ब्राझीलमध्ये हिंसाचार वाढत आहे असं ब्राझीलची वृत्तसंस्था, अॅशनसिया ब्रेझेलने म्हटलं आहे. २०१२ साली खूनांची संख्या ५६,००० च्या वर गेली. आरोग्य मंत्रालयाने नोंद केलेली ही संख्या, आधीच्या वर्षांपेक्षा खूप जास्त आहे. नैतिक मूल्यं कमी होत चालल्यामुळे ही वाढ होत आहे, असं नागरिक सुरक्षा तज्ञ लुईस सापोरे यांना वाटतं. एकदा लोकांच्या मनातून सुसंस्कृत समाजाबद्दल आदर निघून गेला की, “ते आपल्याला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी ताकदीचा गैरवापर करतात,” असं ते म्हणतात.

तुम्हाला माहीत होतं का? बायबलमध्ये अशा काळाबद्दल सांगितलं आहे जेव्हा प्रेम “थंडावेल” आणि अनीती वाढेल.—मत्तय २४:३, १२. (g16-E No. 5)