व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्क्रांती की निर्मिती?

मगरीचा जबडा

मगरीचा जबडा

आत्ता जिवंत असलेल्या सर्व प्राण्यांपैकी मगरीचा चावा सर्वात शक्तिशाली असल्याचं दिसून आलं आहे. जसं की, ऑस्ट्रेलियात खारट पाण्यात आढळणारी मगर, सिंहाच्या किंवा वाघाच्या चाव्यापेक्षा जवळजवळ तीन पटीनं जोरात चावा घेऊ शकते. असं असलं तरी, तिचा जबडा सर्वांत संवेदनशील असल्याचं दिसून आलं आहे. मानवाच्या बोटांच्या टोकांना एकदम हलका स्पर्शसुद्धा जाणवू शकतो. परंतु अलिकडंच असा शोध लागला आहे, की मानवांच्या बोटांपेक्षाही मगरीचा जबडा संवेदनशील आहे. तो अतिसूक्ष्म स्पर्शही जाणवू शकतो. पण मगरीच्या जबड्यावरची कातडी तर इतकी खडबडीत दिसते, मग ती इतकी संवेदनशील कशी काय?

मगरीच्या जबड्यावर हजारो संवेदक इंद्रियं असतात. यांचा अभ्यास केल्यावर डंकन लीच नावाच्या संशोधकानं म्हटलं: “मगरीच्या जबड्याची प्रत्येक शीर तिच्या कवठीत असलेल्या एका छिद्रातून तिच्या मेंदूशी जोडलेली असते.” यामुळं जबड्यातील शिरा सुरक्षित राहतात. तिच्या जबड्याच्या संवेदना मोजण्याकरता वापरण्यात आलेल्या साधनांतून दिसून आलं, की जबड्याच्या काही भागांतील संवेदना इतर भागांतील संवेदनांपेक्षा इतकी जास्त होती की ती मोजतादेखील आली नाही. या सूक्ष्म स्पर्शज्ञानामुळं मगरीला तिच्या तोंडातील अन्न आणि कचरा यांतला फरक लगेच कळतो. आणि म्हणूनच मगर तिच्या नवीन जन्मलेल्या पिल्लांना कसलीही इजा न करता तिच्या जबड्यात सुरक्षितपणे उचलू शकते. मगरीचा जबडा हा शक्ती आणि संवेदना यांचा थक्क करणारा संगम आहे.

तुम्हाला काय वाटतं? मगरीचा जबडा उत्क्रांतीनं अस्तित्वात आला की कुणीतरी तिची रचना केली? ▪ (g15-E 07)