व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यशयाचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • पिता आणि त्याची बंडखोर मुलं (१-९)

    • यहोवाला दिखाऊ उपासना आवडत नाही (१०-१७)

    • “आता या, आपण आपसात बोलू” (१८-२०)

    • विश्‍वासू शहर म्हणून सीयोनची पुन्हा स्थापना (२१-३१)

    • यहोवाचा पर्वत उंच केला जाईल (१-५)

      • तलवारींचे फाळ बनवले जातील ()

    • यहोवाचा दिवस गर्विष्ठांना नमवेल (६-२२)

    • यहूदाचे पुढारी लोकांची दिशाभूल करतात (१-१५)

    • सीयोनच्या मुलींचा न्याय (१६-२६)

    • सात स्त्रिया एका माणसामागे जातील ()

    • यहोवा जमिनीतून जे उगवेल ते सुंदर असेल (२-६)

    • यहोवाच्या द्राक्षमळ्याबद्दलचं गीत (१-७)

    • यहोवाच्या द्राक्षमळ्याचा केलेला धिक्कार (८-२४)

    • देवाचा आपल्या लोकांवर भडकलेला क्रोध (२५-३०)

    • यहोवा मंदिरात असल्याचा दृष्टान्त (१-४)

      • “यहोवा हा पवित्र, पवित्र, पवित्र आहे!” ()

    • यशयाचा दोष दूर केला जातो (५-७)

    • यशयाला मिळालेली जबाबदारी (८-१०)

      • “मी जाईन! मला पाठव!” ()

    • “हे यहोवा! असं किती दिवस चालेल?” (११-१३)

    • आहाज राजासाठी संदेश (१-९)

      • शआर-याशूब ()

    • इम्मानुएल, एक चिन्ह (१०-१७)

    • अविश्‍वासूपणाचे परिणाम (१८-२५)

    • अश्‍शूरच्या हल्ल्याविषयी भविष्यवाणी (१-८)

      • महेर-शालाल-हाश-बज (१-४)

    • घाबरू नका⁠​—⁠देव आपल्यासोबत आहे! (९-१७)

    • यशया आणि त्याची मुलं इस्राएलसाठी चिन्हं (१८)

    • नियमशास्त्राकडे वळा, दुष्ट स्वर्गदूतांकडे नाही (१९-२२)

    • गालीलच्या प्रदेशात तेजस्वी प्रकाश (१-७)

      • शांतीच्या राजकुमाराचा जन्म (६, ७)

    • देवाने इस्राएलवर उगारलेला हात (८-२१)

  • १०

    • देवाने इस्राएलवर उगारलेला हात (१-४)

    • अश्‍शूर⁠​—⁠​देवाच्या क्रोधाची छडी (५-११)

    • अश्‍शूरला शिक्षा (१२-१९)

    • याकोबचे उरलेले परत येतील (२०-२७)

    • देव अश्‍शूरचा न्याय करेल (२८-३४)

  • ११

    • इशायची फांदी नीतीने शासन करेल (१-१०)

      • लांडगा आणि कोकरू एकत्र राहतील ()

      • संपूर्ण पृथ्वी यहोवाच्या ज्ञानाने भरून जाईल ()

    • उरलेल्या लोकांना पुन्हा आणलं जातं (११-१६)

  • १२

    • उपकारस्तुतीचं गीत (१-६)

      • “याह माझं बळ आहे” ()

  • १३

    • बाबेलविषयी न्यायाचा संदेश (१-२२)

      • यहोवाचा दिवस जवळ आहे! ()

      • मेदचे लोक बाबेलला उलथवून टाकतील (१७)

      • बाबेलमध्ये कधीही लोकवस्ती होणार नाही (२०)

  • १४

    • इस्राएली लोक आपल्या देशात राहतील (१, २)

    • बाबेलच्या राजाला टोमणे मारले जातात (३-२३)

      • तेजस्वी तारा आकाशातून खाली पडेल (१२)

    • यहोवाचा हात अश्‍शूरला चिरडेल (२४-२७)

    • पलेशेथविरुद्ध न्यायाचा संदेश (२८-३२)

  • १५

    • मवाबविरुद्ध न्यायाचा संदेश (१-९)

  • १६

    • मवाबविरुद्ध न्यायाचा संदेश पुढेही चालू (१-१४)

  • १७

    • दिमिष्कविरुद्ध न्यायाचा संदेश (१-११)

    • यहोवा राष्ट्रांना धमकावेल (१२-१४)

  • १८

    • इथियोपियाविरुद्ध न्यायाचा संदेश (१-७)

  • १९

    • इजिप्तविरुद्ध न्यायाचा संदेश (१-१५)

    • यहोवा कोण आहे हे इजिप्तला कळेल (१६-२५)

      • इजिप्तमध्ये यहोवासाठी एक वेदी (१९)

  • २०

    • इजिप्तसाठी आणि इथियोपियासाठी चिन्ह (१-६)

  • २१

    • समुद्राच्या ओसाड प्रदेशाविरुद्ध न्यायाचा संदेश (१-१०)

      • टेहळणी बुरुजावरून पहारा ()

      • “पडली! बाबेल पडली!” ()

    • दुमाविरुद्ध आणि वाळवंटाविरुद्ध न्यायाचा संदेश (११-१७)

      • “पहारेकऱ्‍या, रात्र अजून किती बाकी आहे?” (११)

  • २२

    • दृष्टान्ताच्या खोऱ्‍याविरुद्ध न्यायाचा संदेश (१-१४)

    • शेबना कारभाऱ्‍याच्या जागी एल्याकीमची नेमणूक (१५-२५)

  • २३

    • सोरविरुद्ध न्यायाचा संदेश (१-१८)

  • २४

    • यहोवा देशाला रिकामं करतो (१-२३)

      • यहोवा सीयोनमध्ये राजा बनतो (२३)

  • २५

    • देवाच्या लोकांवर आशीर्वादांचा वर्षाव (१-१२)

      • यहोवाच्या मेजवानीत उत्तम द्राक्षारस ()

      • मृत्यू कायमचा काढून टाकला जाईल ()

  • २६

    • भरवसा आणि तारण यांबद्दलचं गीत (१-२१)

      • यहोवा हा सर्वकाळ टिकून राहणारा खडक ()

      • पृथ्वीवरचे लोक नीतिमत्त्व शिकतील ()

      • “तुझे मेलेले जिवंत होतील” (१९)

      • आपापल्या आतल्या खोल्यांमध्ये जाऊन लपा (२०)

  • २७

    • यहोवा लिव्याथानाला मारून टाकतो ()

    • द्राक्षमळा म्हटलेल्या इस्राएलबद्दल गीत (२-१३)

  • २८

    • एफ्राईममधल्या दारुड्यांचा धिक्कार (१-६)

    • यहूदामधले याजक आणि संदेष्टे द्राक्षारसामुळे वाट चुकतात (७-१३)

    • मृत्यूशी करार (१४-२२)

      • मौल्यवान अशा एका कोपऱ्‍याच्या दगडाचा पाया (१६)

      • यहोवाचं विलक्षण कार्य (२१)

    • यहोवा योग्य शिस्त लावतो त्याचं उदाहरण (२३-२९)

  • २९

    • अरीएलचा धिक्कार! (१-१६)

      • फक्‍त ओठांनी सन्मान करणं चुकीचं (१३)

    • बहिरे ऐकतील आणि आंधळे पाहू लागतील (१७-२४)

  • ३०

    • इजिप्तकडून मिळणारी मदत व्यर्थ (१-७)

    • लोक देवाचा संदेश नाकारतात (८-१४)

    • भरवसा ठेवलात तर शक्‍तिशाली व्हाल (१५-१७)

    • यहोवा आपल्या लोकांवर कृपा करतो (१८-२६)

      • यहोवा हा महान शिक्षक (२०)

      • “योग्य मार्ग हा आहे” (२१)

    • यहोवा अश्‍शूरवर न्यायदंड बजावतो (२७-३३)

  • ३१

    • खरी मदत देवाकडून, माणसांकडून नाही (१-९)

      • इजिप्तचे घोडे हाडामांसाचे आहेत ()

  • ३२

    • राजा आणि अधिकारी न्यायाने शासन करतील (१-८)

    • स्वस्थ बसलेल्या स्त्रियांना ताकीद (९-१४)

    • पवित्र शक्‍तीच्या वर्षावामुळे आशीर्वाद (१५-२०)

  • ३३

    • नीतिमानांसाठी न्याय आणि आशा (१-२४)

      • यहोवा न्यायाधीश, नियम देणारा आणि राजा आहे (२२)

      • “मी आजारी आहे,” असं एकही रहिवासी म्हणणार नाही (२४)

  • ३४

    • यहोवा राष्ट्रांवर सूड उगवेल (१-४)

    • अदोम ओसाड पडेल (५-१७)

  • ३५

    • पृथ्वीवर पुन्हा नंदनवन (१-७)

      • आंधळ्यांचे डोळे उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील ()

    • सुटका झालेल्यांसाठी ‘पवित्रतेचा मार्ग’ (८-१०)

  • ३६

    • सन्हेरीब यहूदावर हल्ला करतो (१-३)

    • रबशाके यहोवाची निंदा करतो (४-२२)

  • ३७

    • हिज्कीया यशयाद्वारे यहोवाकडे मदत मागतो (१-७)

    • सन्हेरीब यरुशलेमला धमकावतो (८-१३)

    • हिज्कीयाची प्रार्थना (१४-२०)

    • देवाचं उत्तर (२१-३५)

    • एक स्वर्गदूत अश्‍शूरच्या १,८५,००० सैनिकांना ठार मारतो (३६-३८)

  • ३८

    • हिज्कीयाचा आजार आणि त्याचं बरं होणं (१-२२)

  • ३९

    • बाबेलवरून आलेले दूत (१-८)

  • ४०

    • देवाच्या लोकांचं सांत्वन (१-११)

      • ओसाड रानात घोषणा करणाऱ्‍याचा आवाज (३-५)

    • देवाची महानता (१२-३१)

      • राष्ट्रं बादलीतल्या पाण्याच्या थेंबासारखी (१५)

      • देव पृथ्वीच्या गोलाच्या वर निवास करतो (२२)

      • देव सर्व ताऱ्‍यांना नावाने हाक मारतो (२६)

      • देव कधी थकत नाही (२८)

      • यहोवाची आशा धरल्याने नवीन शक्‍ती मिळते (२९-३१)

  • ४१

    • विजय मिळवणारा पूर्वेकडून येतो (१-७)

    • देवाचा सेवक म्हणून इस्राएलची निवड (८-२०)

      • अब्राहाम देवाचा मित्र ()

    • इतर दैवतांना आव्हान (२१-२९)

  • ४२

    • देवाचा सेवक आणि त्याचा उद्देश (१-९)

      • “मी यहोवा आहे. हे माझं नाव आहे” ()

    • यहोवाच्या स्तुतीसाठी नवीन गीत (१०-१७)

    • इस्राएल आंधळा आणि बहिरा आहे (१८-२५)

  • ४३

    • यहोवा आपल्या लोकांना पुन्हा एकत्र करतो (१-७)

    • खोट्या दैवतांविरुद्ध खटला (८-१३)

      • “तुम्ही माझे साक्षीदार आहात” (१०, १२)

    • बाबेलमधून सुटका (१४-२१)

    • “आपण एकमेकांसमोर आपला खटला सादर करू” (२२-२८)

  • ४४

    • यहोवाच्या निवडलेल्या लोकांवर आशीर्वाद (१-५)

    • यहोवाला सोडून दुसरा कोणीही देव नाही (६-८)

    • माणसांनी बनवलेल्या मूर्तींची व्यर्थता (९-२०)

    • यहोवा, इस्राएलचा सोडवणारा (२१-२३)

    • कोरेशद्वारे पुन्हा स्थापना (२४-२८)

  • ४५

    • बाबेलवर कब्जा मिळवण्यासाठी कोरेशचा अभिषेक (१-८)

    • मातीचा गोळा कुंभाराशी वाद घालू शकत नाही (९-१३)

    • इतर राष्ट्रं इस्राएलला मान देतात (१४-१७)

    • सृष्टी आणि भविष्यवाण्या दाखवतात, की देव भरवशालायक आहे (१८-२५)

      • पृथ्वीवर लोकांनी राहावं म्हणून तिची निर्मिती (१८)

  • ४६

    • बाबेलची दैवतं आणि इस्राएलचा देव (१-१३)

      • यहोवा भविष्य सांगतो (१०)

      • पूर्वेकडून येणारा शिकारी पक्षी (११)

  • ४७

    • बाबेलचा नाश (१-१५)

      • ज्योतिष्यांचा परदाफाश (१३-१५)

  • ४८

    • इस्राएलची कानउघाडणी; त्याला शुद्ध केलं जातं (१-११)

    • यहोवा बाबेलच्या विरोधात उठेल (१२-१६क)

    • देवाकडून मिळणारं शिक्षण लाभदायक (१६ख-१९)

    • “बाबेलमधून निघा!” (२०-२२)

  • ४९

    • यहोवाच्या सेवकाचं काम (१-१२)

      • राष्ट्रांसाठी प्रकाश ()

    • इस्राएलला सांत्वन (१३-२६)

  • ५०

    • इस्राएलवर आलेल्या समस्या त्याच्याच पापांमुळे (१-३)

    • यहोवाचा आज्ञाधारक सेवक (४-११)

      • सुशिक्षितांची जीभ आणि कान ()

  • ५१

    • सीयोन पुन्हा एदेन बागेसारखी (१-८)

    • सीयोनच्या महान निर्माणकर्त्याकडून सांत्वन (९-१६)

    • यहोवाच्या क्रोधाचा प्याला (१७-२३)

  • ५२

    • “हे सीयोन, ऊठ! जागी हो!” (१-१२)

      • आनंदाचा संदेश घेऊन येणाऱ्‍यांचे पाय सुंदर ()

      • सीयोनचे पहारेकरी एकत्र मिळून आनंदाने ओरडत आहेत ()

      • यहोवाच्या मंदिरातली भांडी वाहणाऱ्‍यांनी शुद्ध असावं (११)

    • यहोवाच्या सेवकाचा गौरव होईल (१३-१५)

      • त्याचं स्वरूप बिघडलेलं (१४)

  • ५३

    • यहोवाच्या सेवकाचा छळ, मृत्यू आणि त्याचं दफन (१-१२)

      • त्याला तुच्छ समजण्यात आलं आणि टाळलं गेलं ()

      • त्याने आजार आणि दुःखं वाहिली ()

      • “एखाद्या मेंढरासारखं त्याला कत्तल करण्यासाठी नेण्यात आलं” ()

      • “त्याने अनेकांच्या पापांचं ओझं वाहिलं” (१२)

  • ५४

    • वांझ असलेल्या सीयोनला अनेक मुलं होतील (१-१७)

      • यहोवा सीयोनला पतीसारखा ()

      • सीयोनची सर्व मुलं यहोवाने शिकवलेली असतील (१३)

      • सीयोनवर कोणतंही हत्यार चालणार नाही (१७)

  • ५५

    • पाणी आणि अन्‍न मोफत घ्या (१-५)

    • यहोवाचा आणि त्याच्या भरवशालायक वचनाचा शोध करा (६-१३)

      • देवाचे मार्ग माणसांच्या मार्गांपेक्षा उंच (८, ९)

      • यहोवाचं वचन पूर्ण झाल्याशिवाय परत येणार नाही (१०, ११)

  • ५६

    • विदेश्‍यांवर आणि नपुंसकांवर आशीर्वाद (१-८)

      • सर्व राष्ट्रांतल्या लोकांसाठी असलेलं प्रार्थना-मंदिर ()

    • आंधळे पहारेकरी मुक्या कुत्र्यांसारखे (९-१२)

  • ५७

    • नीतिमान आणि एकनिष्ठ माणूस नाहीसा झाला आहे (१, २)

    • इस्राएलने देवाशी केलेल्या विश्‍वासघाताचं भांडं फोडलं जातं (३-१३)

    • दुःखी आणि खचून गेलेल्यांना सांत्वन (१४-२१)

      • दुष्ट लोक खवळलेल्या समुद्रासारखे (२०)

      • दुष्टांना कधीच शांती नसते (२१)

  • ५८

    • खरा आणि दिखाऊ उपास (१-१२)

    • शब्बाथाचा दिवस आनंदाने पाळावा (१३, १४)

  • ५९

    • इस्राएलची पापं त्यांना देवापासून दूर नेतात (१-८)

    • पापांची कबुली (९-१५क)

    • पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांसाठी यहोवा पाऊल उचलतो (१५ख-२१)

  • ६०

    • यहोवाचं वैभव सीयोनवर चमकत आहे (१-२२)

      • कबुतरांसारखं आपल्या कबुतरखान्यात येणारे ()

      • तांब्याच्या जागी सोनं (१७)

      • जो सगळ्यात लहान, तो हजार होईल (२२)

  • ६१

    • आनंदाचा संदेश सांगण्यासाठी अभिषेक (१-११)

      • “यहोवाच्या कृपेचं वर्ष” ()

      • “नीतिमत्त्वाचे मोठे वृक्ष” ()

      • विदेशी लोक मदत करतील ()

      • “यहोवाचे याजक” ()

  • ६२

    • सीयोनला नवीन नाव (१-१२)

  • ६३

    • यहोवा राष्ट्रांवर आपला सूड उगवतो (१-६)

    • पूर्वीच्या काळात यहोवाने दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम (७-१४)

    • पश्‍चात्तापाची प्रार्थना (१५-१९)

  • ६४

    • पश्‍चात्तापाची प्रार्थना पुढे चालू (१-१२)

      • यहोवा “आमचा कुंभार” ()

  • ६५

    • मूर्तिपूजा करणाऱ्‍यांविरुद्ध यहोवाचा न्यायदंड (१-१६)

      • भाग्य दैवत आणि नशीबाचं दैवत (११)

      • “माझे सेवक पोटभर खातील” (१३)

    • नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी (१७-२५)

      • घरं बांधतील; द्राक्षांचे मळे लावतील (२१)

      • मेहनत व्यर्थ जाणार नाही (२३)

  • ६६

    • खरी उपासना आणि खोटी उपासना (१-६)

    • सीयोन आणि तिची मुलं (७-१७)

    • लोक यरुशलेममध्ये उपासना करायला एकत्र जमतात (१८-२४)